नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे महान विचार
आईचे प्रेम सर्वात खोल आहे! निःस्वार्थ! ते कोणत्याही प्रकारे मोजले जाऊ शकत नाही! - नेताजी सुभाषचंद्र बोस
अन्यायाशी तडजोड करणे हे सर्वात मोठे पाप आहे. - नेताजी सुभाषचंद्र बोस
आमच्या सार्वत्रिक जीवनाचा आदर्शभूत पाया न्याय, समता, स्वातंत्र्य, शिस्त आणि प्रेम हा असावा. - नेताजी सुभाषचंद्र बोस
कष्ट आणि सेवा यातच खरा आनंद आहे, जे दुसऱ्यासाठी झटतात त्यांनाच खऱ्या आनंदाचा आस्वाद घेता येतो. - नेताजी सुभाषचंद्र बोस
जाती संस्थेचे निर्मुलन करा, जातीभेद, धर्मभेद यांना काहीही अर्थ नाही. - नेताजी सुभाषचंद्र बोस
जीवन म्हणजे सुखद शय्या नसून एक समरभूमी आहे. - नेताजी सुभाषचंद्र बोस
डोळ्यात आशेचे स्वप्न, हातात मृत्यूचे फुल आणि अंत:करणात स्वातंत्र्याचे वादळ हाच खरा क्रांतिकारकाचा बाणा आहे. - नेताजी सुभाषचंद्र बोस
तात्पुरत्या पराभवाने दाबून खचून जाऊ नका. - नेताजी सुभाषचंद्र बोस
तुमची प्रेरणा, तुमची चेतना साजिवंत ठेवा. - नेताजी सुभाषचंद्र बोस
भिक मागून कधीनी कोणाला स्वातंत्र्य प्राप्त करता येणार नाही, ते ताकदीनेच मिळवले पाहिजे, आणि त्याची किंमत रक्त ही आहे. - नेताजी सुभाषचंद्र बोस
मरावे कसे हे निश्चित करा म्हणजे जगावे कसे हे शिकाल. - नेताजी सुभाषचंद्र बोस
व्यक्तीच्या त्यागातूनच राष्ट्र उभे राहत असते. - नेताजी सुभाषचंद्र बोस
सदा सर्वदा आनंदित रहा. - नेताजी सुभाषचंद्र बोस
“तू मला रक्त दे, मी तुला स्वातंत्र्य देईन!” - नेताजी सुभाषचंद्र बोस
पण मला हे माहित आहे, शेवटी विजय आपलाच असेल! “ - नेताजी सुभाषचंद्र बोस
“राष्ट्रवाद हा मानवजातीचा सर्वोच्च आदर्श आहे, सत्य शिव आणि सुंदर यांनी प्रेरित केले आहे. “ - नेताजी सुभाषचंद्र बोस
“संघर्षाने मला माणूस बनविला! माझा आत्मविश्वास वाढला, जो यापूर्वी नव्हता!” - नेताजी सुभाषचंद्र बोस
“दुःखात निःसंशयपणे आंतरिक नैतिक मूल्य आहे!” - नेताजी सुभाषचंद्र बोस
“माझ्यात जन्मजात प्रतिभा नव्हती, परंतु कठोर परिश्रम टाळण्याची प्रवृत्ती माझ्याकडे कधीच नव्हती!” - नेताजी सुभाषचंद्र बोस
“आपण फक्त संघर्ष आणि त्यांचे निराकरण करून पुढे जाऊ शकतो !” - नेताजी सुभाषचंद्र बोस
“श्रद्धा नसणे हेच सर्व दु: खाचे मूळ कारण आहे!” - नेताजी सुभाषचंद्र बोस
“जर आयुष्यात संघर्ष नसेल आणि कोणत्याही भीतीचा सामना करण्याची गरज पडत नसेल, तर जीवन जगण्याची मज्जाच संपते!” - नेताजी सुभाषचंद्र बोस
माझ्यावर कितीही संकट अली तरी मी घाबरणार नाही, मी पळून जाणार नाही, मी त्याचा सामना करत पुढे जाईन . - नेताजी सुभाषचंद्र बोस
“तुम्हीसुद्धा सहमत व्हाल, एक दिवस माझी तुरूंगातून सुटका होईल, कारण प्रत्येक दु: खाचा शेवट अटळ आहे!” - नेताजी सुभाषचंद्र बोस
“मला आयुष्यातील एक निश्चित ध्येय साध्य करायचं आहे! त्याकरिताच माझा जन्म झाला आहे! मला नैतिक विचारांच्या प्रवाहात जायचे नाही!” - नेताजी सुभाषचंद्र बोस
“भविष्य अजूनही माझ्या हातात आहे!” - नेताजी सुभाषचंद्र बोस
